Featured

First blog post

This is the post excerpt.

Advertisements

This is your very first post. Click the Edit link to modify or delete it, or start a new post. If you like, use this post to tell readers why you started this blog and what you plan to do with it.

post

वृद्धाश्रम वृद्धांसाठी संजीवनी तर कैद्यांप्रमाणे सजा

अगदी रामायण महाभारत या पुराणिका कथांपासून भारतीय संस्कृतीत आई-वडिलांचे महत्वाचे स्थान आहे. परंतु आजकालच्या विज्ञानयुगात भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे.पाश्चात संस्कृतीचे अनुकरण हे सुद्धा त्याचे कारण असू शकते. परंतु या बदलत्या संस्कृतीमुळे सर्वात जास्त परिणाम हा शहरीभागातील जीवनावर होत आहे. ग्रामीण भागात फारसा परिणाम होत नाही. कारण वाढते शहरीकरण यामुळे अपुरी जागा, सुख-सुविधांचा मोह, व घरभाडे अशा अनेक कारणांमुळे एकत्र कुटुंब पद्धतीत वाद निर्माण होतात. व अनेक पती-पत्नी वयक्तिक जीवन जगण्यासाठी विचार करू लागतात यातील सर्वात मोठा अडसर ठरतात ते आई-वडील मग याच विवंचनेतून आपल्या जन्म दिलेल्या व लहानाचे मोठे केलेल्या आई-वडिलांना उतरत्या वयात वृद्ध-आश्रमात पाठवतात.                      वृद्धाश्रमात हे वयस्कर  आई -वडिलांसाठी  संजीवनी ठरते कारण वृद्धाश्रम निसर्गिक वातावरण मोकळी हवा छंद जोपासण्याचे स्वातंत्र्य व एकदाचा संपणारा कुटुंबीय वाद. त्यामुळे वृद्धाना मोकळे जीवन जगण्याचा संधी मिळते परंतु जिवंत पणी एखाद्या कैद्याप्रमाणे सजा भोगावी लागते. कारण त्यांना चार भिंतीच्या परिस्थितीतच राहावे लागते वृधाश्र्माचे वाढते प्रमाण हे कुठेतरी भारतीय संस्कृती चा होणाऱ्या ऱ्हासाचे संकेतच म्हणावे लागेल.

वृक्षलागवड एक काळाची गरज

ज्या वेळी पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा हवा, पाणी, आणि माती दगड एवढेच होते. कालानुरूप परीस्थिती बदलत गेली अगोदर आदिमानव हा उपजीविका भागवण्यासाठी वृक्षांची फळे खात होता. जसे आदिमानवाचे रुपांतर मानवात झाले तेव्हापासून मानव हा अन्न,वस्त्र, व निवारा या मुलभूत गरजा भागवण्यासाठी झाडांची तोड करू लागला. त्यामुळे जंगलांची तोड होऊ लागली. लाकडाची घरे,लाकडापासून झहाजबांधणी, ई साठी झाडांची तोड मोठ्या प्रमाणात झाली. जशी जशी मानवाची विज्ञाणामुळे प्रगती होत गेली तशी तशी जंगलतोड वाढत गेली. नैसर्गिक आपत्ती, मानवीवस्तीसाठी जागा, त्याचबरोबर खानद्योगासाठी होणारी जंगल तोड या मुळे पृथ्वीवरील वृक्षांचे प्रमाण खूप कमी झाले असल्याचे दिसते. व आज वृक्षतोडीमुळे प्रदूषण तर वाढलेच तर पृथ्वीवरी असण्याऱ्या ओझान वायूच्या कमी होण्याऱ्या थरामुळे सूर्याची अतिनील किरणे या मुळे तापमानात वाढ झाली. अल्प वृक्षामुळे पाऊसाचे प्रमाण कमी होणे या सारक्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वृक्षलागवडीच्या माध्येमातून वृक्षांची संख्या वाढविणे काळाची गरज आहे…   

मुंबईतील शिवसेनेचे वर्चस्व…………..

हिंदू ह्रदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई मध्ये मराठी जनसमुदाय एकत्र करून १९ जुन १९६६मध्ये शिवसेना या पक्षाची स्थापना केली. १९६६ पासून शिवसेनेचा हिंदुत्ववादी आणि मराठी हाच अजेंडा आहे व आजही तो कायम असल्याचे दिसते.  शिवसेनेचा राजकीय प्रवास हा मुंबई पासूनच सुरु झाला आणि त्यांनी मुंबई च्या महानगरपालिकाची सत्ता काबीज केली. तेव्हापासून आजपर्यंत मुंबई मध्ये

शिवसेनेला कोणताच पक्ष सत्तेपासून वंचित ठेवण्यास यशस्वी होऊ शकला नाही याचे ताजे उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकाची निवडणूक मित्र पक्ष असलेल्या भाजपाने पूर्ण ताकतीने  शिवसेनेला टक्कर दिली परंतु सत्ता काबीज करण्यास ते अयशस्वी राहिले. याचे मुख्य कारण म्हणजे मुंबईतील मराठी माणसाचा असणारा पाठींबा आणि प्रभागातील विकासकामे व शिवसेनेचा असणारा जनसंपर्क. शिवसेना मुंबईच्या मोठ्या समस्या जरी सोडवू शकली नसली तरी मराठी माणसाच्या मनातील वाढती लोकप्रियता याच कारणामुळे शिवसेनेला मुंबई मध्ये यश मिळाले आहे.  

माझ्या आयुष्यातील मनाला आनंद देणारा दिवस

२५ मार्च २०१७ हा दिवस माझ्या आयुष्यातील मनाला आनंद देणारा दिवस ठरला. कारण मी त्या दिवशी कॉलेजमध्ये रक्तदान केले. मी ज्या वेळेस कॉलेज मध्ये आलो तेव्हा कॅम्प पाहिला आणि कॅन्टीन मध्ये निघून गेलो परत आल्यावर माझी नजर त्या कॅम्पकडे केंद्रित झाली आणि नितीन ला घेऊन कॅम्प मध्ये गेलो. नितीन ला आपण फक्त वजन करून परत येऊ असे सांगितले आणि कॅम्प मध्ये गेलो मी माझे वजन मोजले ते ५१.०८ असे भरले. डॉक्टर मॅडम नी मला विचारले blood donnet करणार आहात का मी तत्काळ उत्तर दिले तुम्ही blood घेणार आहात का त्यांनी हो सांगितले मी लगेच होकार दिला. त्यानंतर माझे blood टेस्टिंग साठी घेतले आणि चेक केले. मला नस्ता करायेला सांगितला मी नस्ता केला आणि मग blood donnet साठी बेड वर झोपलो त्यांनी प्रोसेस सुरवात केली.आणि मुठ बांधून blood donnet करत होतो. एकदाचे blood घेऊन संपले आणि सुई काढून टाकली व मला प्रशस्तीपत्र दिले गेले. मला काही वेळेसाठी थोडे अशक्त वाटत होते परंतु जेवण केल्या नंतर मला बरे वाटत होते आणि रात्री मला blood donet केल्याने खूप आनंद वाटत होता. मन माझे भरून वाटत होते….. कारण आपल्यामुळे कुणाचे तरी प्राण वाचण्यास मदत होईल असे मनास वाटत होते.  

शेतकऱ्यांच्या आत्महत्या…..

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. कारण भारताने कृषी क्षेत्रात चांगली प्रगती साधली आहे.इतिहासमध्ये हरित क्रांती व धवल क्रांतीच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय व शेतीव्यवसाय याद्वारे शेतकऱ्यांनी चांगली प्रगती साधली असल्याचे चित्र जवळपास २००० पर्यत होते. परंतु त्यानंतर चित्र पूर्णपणे बदलण्यास सुरुवात झाली देशाबरोबरच महाराष्ट्रतला शेतकरी हा आत्महत्या या सारखे गंभीर पाऊल उचलत असल्याचे दिसून येते. प्रमुख करणे म्हणजे कर्जबाजारीपणा,नापिकी,नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान यासारख्या समस्यांमुळे शेतकरी हा मृत्यूला कवटाळतोय तरी सुद्धा कोणतेही शासन ठोस पाऊले उचलण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसते. कृषिप्रधान देशात शेतकरी राजा आत्महत्या करतोय हि लाजिरवाणी गोष्ट असली तरी यामागचे खरे गांभीर्य कोणीही शोधात नाही.

शेतीमधून कच्चा माल मिळत असलातरी कच्च्यामालाला भाव नाही. तसेच ऊस,कापूस,कडधान्ये यांना बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे भांडवल जमा होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. मग उत्पन्न कमी आणि खर्च जास्त या विवंचनेतून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावतो सोबतच बी-बियांनाणसाठी घेतलेले कर्ज वेळेच भरू न शेकल्यामुळे शेतकरी आत्महत्तेकडे वळत असल्याने आज महाराष्ट्रत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत व करत आहेत. तरीही शासन शेतीमालास वाढीव बाजारभाव देत नाही. जर शेतकऱ्यांकडे पैसेच येत नसतील तर ते कसे कर्ज फेडणार,कसे भांडवल उभा करणार व कसे उदरनिर्वाह करणार शेवटी उरतो तो एकच पर्याय …………………………………………………………..आत्महत्या .

हुंडा प्रथा हेच स्त्रीभ्रूणहत्येचे मूळ कारण

आज जवळपास सर्व जाती धर्माच्या समुदायामध्ये हुंद्यासारखी अनिष्ट प्रथा रुड झाल्याचे दिसून येते हे आपल्याला माहित आहे. हुंडा देणे आणि घेणे यामुळे मुलीच्या आई वडिलांना किती त्रास होतो याचा कुठलाच विचार न करता हि प्रथा सर्रास चालू आहे याचे सर्वात जास्त प्रमाण महाराष्ट्रत आहे. यामुळे समाजात हुंडाबळी,स्त्रीभ्रूणहत्या, मुलीच्या लग्नापाई आई वडिलांची आत्महत्या ई. प्रकार घडत असताना सुद्धा सुशिक्षित वर्गाला हुंडा घेण्यासाठी थोडीशीही लाज वाटत नाही. उलट बोली वाढवण्याचे प्रकार होतात. परिणामी हुंडा प्रथेमुळे  स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण वाढत आहे. मुलगी जन्माला आली की तिला लहानाचे मोठे करायचे, शिक्षण शिकवायचे आणि हुंडा देऊन लग्न लाऊन ध्यायचे या चिंतेमुळे मुलीला जन्माला न घालणे यातच आजची पिढी भाग्य समजत आहे. असेच सुरु राहिल्यास येणाऱ्या काळात स्त्री-पुरुष यांच्या गुणोत्तर प्रमाणात तफावत जाणवल्याशिवाय राहणार नाही हे नवीन पिढीने लक्षात घेतले पाहिजे.

मराठवाड्याचे भूमिपुत्र विकासभिमुख नेतृत्व

मराठवाडा विकासाठी जे पर्व हाती घेतले ते कॉंग्रेस चे माजी मुख्यमंत्री मा.शंकरराव चव्हाण यांनी. मराठवाड्यासाठी पैठण चे नाथसागर (जायकवाडी) धरण बांधले तसेच माजलगाव लघुप्रकल्प बांधला. यामुळे शेतकरी वर्गाला जलसिंचन तर मिळाले त्याच बरोबर परळीच्या औश्निक विद्युत केंद्राला पाणी. त्यानंतर कॉंग्रेस चे दुसरे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी लातूरचा कायापालट केला. जिल्हा विभाजनानंतर शहरातील रस्ते, रेल्वेमार्ग मंजुरी, व पाण्याची व्यवस्था लातुरकारांसाठी केली. यानंतर कॉंग्रेस चे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड शहराचा कायापालट तर केलाच सोबतच ग्रामीण भागातील रस्ते व जलसिंचन सुविधा ई.मुलभूत सुविधा पुरविण्याचा ध्यास घेतला. हे जिल्हापरिषद व नगरपरिषदेच्या निवडणुकीत नांदेडकरांनी महाराष्ट्रला दाखवून दिले. बीड जिल्हाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला नगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग भाजपचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नामुळे तसेच संघर्षाने मार्गी लागला सध्या तो पुर्वात्वाच्या स्थितीत असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीचे विधानपरीषद आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी पाथरी शहरास पाणी,रस्ते,नाल्याचे बांधकाम सार्वजनिक सभागृहे इ. विकास कामे करून पाथरी शहरास सुजलाम व सुफलाम बनवले. सध्या गेवराईचे आमदार मा. लक्ष्मण पवार हे शहराचे जवळपास विकासकामे पूर्ण करून ग्रामीणभागात युद्धपातळीवर काम करत आहेत.